१०. गुणी मुले (चित्रकथा) प्रश्नोत्तरे | इयत्ता ३री मराठी
इयत्ता ३री शिकू मराठी आनंदाने – १०. गुणी मुले (चित्रकथा) प्रश्नोत्तरे या पोस्टमध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मराठी पाठ्यपुस्तकातील गुणी मुले या चित्रकथेचे प्रश्न, उत्तरे आणि स्वाध्याय सोप्या भाषेत दिले आहेत. विद्यार्थ्यांना गृहपाठ, अभ्यास, सराव आणि परीक्षेच्या तयारीसाठी ही इयत्ता ३री मराठी प्रश्नोत्तरे उपयुक्त ठरतील.
पाठाचे नाव : १०. गुणी मुले
पृष्ठ क्रमांक : ३५–३७
प्र. १. उत्तरे लिहा.
(अ) खड्डा कोठे आहे?
उत्तर : खड्डा रस्त्यावर आहे.
(आ) मुलांना कोणती कल्पना सुचली?
उत्तर : मुलांना खड्डा दगडांनी बुजवण्याची कल्पना सुचली.
(इ) मुलांनी मिळून काय केले?
उत्तर : मुलांनी मिळून रस्त्यावरील खड्डा दगडांनी बुजवला.
विचार करा व सांगा.
प्र. १. तुमचा मित्र/मैत्रीण सायकलवरून पडला/पडली, तर तुम्ही काय कराल ते सांगा.
उत्तर : जर माझा मित्र/मैत्रीण सायकलवरून पडला तर मी प्रथम त्याला/तिला उठवून सांभाळेन. लागले आहे का ते पाहीन. जास्त इजा झाली असेल तर मोठ्यांना सांगून मदत करेन.
प्र. २. रस्त्यावरून जात असताना तुम्हाला खड्डा दिसला, तर तुम्ही काय कराल? ते सांगा.
उत्तर : रस्त्यावरून जात असताना मला खड्डा दिसला तर मी मोठ्यांना किंवा नगरपालिकेला सांगेल. शक्य असल्यास मोठ्यांच्या मदतीने तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून कुणाला इजा होणार नाही.
खेळू या शब्दांशी
प्र. १. खालील अक्षरांचा योग्य क्रम जुळवून शब्द लिहा.
उत्तर : (१) सायंकाळ (२) मानव (३) धोडगाडा (४) जहाज (५) आगगाडी
प्र. २. पुढील शब्द वाचा.
उत्तर : (१) गडगडाट (२) कडकडाट (३) फडफडाट (४) लखलखाट (५) भरभराट (६) थयथयाट
प्र. ३. पाठातील जोडाक्षरे असले शब्द शोधा व लिहा.
उत्तर : सुरक्षा, सुरक्षित, कल्पना, समस्या, प्रत्येक
लिहिते होऊ या.
प्र. १. तुमच्या परिसरातील कोणतीही एखादी समस्या शोधा. तुम्ही ती कशी सोडवाल ते लिहा.
उत्तर : समस्या : आमच्या गल्लीत कचऱ्याचे ढीग साचतात. सोडवणूक : मी मित्रांसोबत मिळून स्वच्छता मोहीम राबवेन. लोकांना कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगेल आणि नगरपालिकेला तक्रार करेन.
कृतीतून शिकू या.
प्र. १. ‘रस्ता सुरक्षितता’ या विषयावरील खालील घोषवाक्ये वाचा आणि वळणदार अक्षरांत वहीत लिहा.
उत्तर : १. घाई नको, सुरक्षितता हवी. २. वेग ठेवा कमी, जीवनाची मिळेल हमी.
प्र. २. वाचा व समजून घ्या.
उत्तर : ओठांचा वापर करून उच्चारली जाणारी अक्षरे – प, ब, म. दातांचा वापर करून उच्चारली जाणारी अक्षरे – त, द, न. घशाचा वापर करून उच्चारली जाणारी अक्षरे – क, ग, घ.
FAQ
Q. १०. गुणी मुले (चित्रकथा) हा धडा कोणत्या इयत्तेचा आहे?
Ans. १०. गुणी मुले (चित्रकथा) हा इयत्ता ३रीच्या शिकू मराठी आनंदाने या मराठी पाठ्यपुस्तकातील धडा आहे.
Q. गुणी मुले चित्रकथेची प्रश्नोत्तरे कुठे मिळतील?
Ans. या चित्रकथेची प्रश्नोत्तरे आणि स्वाध्यायाची उत्तरे mhtextbook.solutions वर उपलब्ध आहेत.
Q. इयत्ता ३री मराठी प्रश्नोत्तरे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत का?
Ans. होय. प्रश्नोत्तरे विद्यार्थ्यांना पाठ समजून घेण्यासाठी, गृहपाठ पूर्ण करण्यासाठी आणि अभ्यास व परीक्षेच्या तयारीसाठी मदत करतात.
Q. गुणी मुले हा कविता, धडा की चित्रकथा आहे?
Ans. १०. गुणी मुले हा चित्रकथा प्रकारातील धडा आहे.